भुताटकी! थरारक अनुभव देणारे भारातील 8 पर्यटनस्थळं

संतोष कानडे

भानगड किल्ला

राजस्थानमधला भानगड किल्ला हे भारतातला सर्वात भुताटकी ठिकाण मानलं जातं. इथे सूर्यास्तानंतर प्रवेशबंदी असते.

डाऊ हिल, कुर्सियॉंग

पश्चिम बंगालमधलं हे ठिकाण. धुक्याने वेढलेलं हे हिल स्टेशन भारतातल्या सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक मानलं जातं. जंगलात आणि जुन्या शाळेजवळ विचित्र अनुभव आल्याच्या अनेक स्थानिक कथा प्रसिद्ध आहेत.

रॉस आयलंड

अंदमानातलं हे ठिकाण म्हणजे ब्रिटिश काळातील ओसाड इमारती आहेत. रात्री इथे हालचाली जाणवतात, असं स्थानिक म्हणतात.

कुलधारा गाव

राजस्थान इथलच हे ठिकाण एका रात्रीत संपूर्ण गाव ओस पडल्याची कथा आहे. आजही इथे पावलं टाकली की विचित्र शांतता जाणवते.

डोव हिल

दार्जिलिंगमधल्या या ठिकाणी शाळेजवळ डोक्याविना फिरणाऱ्या मुलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक आजही रात्री या भागात जाणं टाळतात.

डुमा बीच

गुजरातमधल्या या बीचवर रात्री हसण्याचे आणि चालण्याचे आवाज ऐकू येतात अशी समजूत आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर मच्छीमार इथे थांबत नाहीत.

आग्रासेनाची विहीर

हे ठिकाण दिल्लीत आहे. पायऱ्या उतरत गेल्या की मन विचित्र शांततेत जातं. अनेकांना इथे अस्वस्थ वाटल्याचा अनुभव आलेला आहे.

सत्य की अफवा?

वरील सर्व ठिकाणांबाबत कुठलेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. पण या ठिकाणांशी जोडलेल्या कहाण्यांमुळे लोक भयभीत होतात.

जगन्नाथ मंदिरावर घारींचा थवा, ती भविष्यवाणी खरी ठरणार?

<strong>येथे क्लिक करा</strong>