संतोष कानडे
पुरी येथील जगन्नाथ धाम मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी घार पक्षांचा थवा घिरट्या मारत होता
स्थानिक लोक या घटनेला 'भविष्य मालिका' या धर्मग्रंथांचा संदर्भ देत आहेत.
हा ग्रंथ १४०० च्या दशकात ओडिशातील पंचसखा यांनी भगवान जगन्नाथांच्या मार्गदर्शनाखाली लिहिला होता, अशी श्रद्धा आहे.
या ग्रंथातील नीलचक्राच्या गुढ रहस्याशी या घटनेचा संदर्भ काही स्थानिक अभ्यासक जोडत आहेत.
नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारख्या समस्यांचे संकेत असू शकतात, असं स्थानिक सांगतात
गरुड हा पक्षी भगवान विष्णूंचं वाहन असल्याने मंदिराच्या ध्वजाला त्याचं संरक्षण आहे. त्यामुळे इतर पक्षी मंदिराच्या शिखराजवळ येत नाहीत; अशी श्रद्धा आहे.
काही लोक याला शुभ तर काही लोक याला अशुभ संकेत मानतात. कारण घारीला गरुडाशी नातं असलेला पवित्र पक्षी मानलं जातं.
ही केवळ एक नैसर्गिक घटना असल्याचं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र स्थानिक लोक या एक इशारा समजत आहेत.