पुणेकर, तुम्ही 'या' ठिकाणांना भेट दिली आहे का?

Monika Shinde

भन्नाट ७ ठिकाणे

पुण्यापासून एका दिवसात पाहून येण्यासारखी ७ भन्नाट ठिकाणे

नाणेघाट, जुन्नर

पुण्यापासून ३ तासांत पोहोचता येणारा, दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेला एक देखणा घाट.

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

पुण्यापासून ३ तासांत पोहोचता येणारे, बाराव्या शतकात बांधलेले पंचायतन प्रकारातील हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात भव्य मंदिर आहे.

नाना फडणीस वाडा, मेणवली

पुण्यापासून २ तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण आहे, जिथे नाना फडणीस यांचा वाडा आणि कृष्णेचा घाट यांसारख्या देखण्या गोष्टी पाहायला मिळतात.

संगम माहुली, सातारा

पुण्यापासून २.५ तासात पोहोचता येणारी कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर स्थित दोन देखणी मंदिरे. अनेक चित्रपटांचे शुटिंग येथे झाले आहे.

रणगाडा संग्रहालय, नगर

नगर येथील संग्रहालयात युद्धात वापरलेले रणगाडे आणि निजामशाहीच्या खुणा असलेले महल पाहता येतात.

रायरेश्वर पठार, पुणे

पुण्यापासून भोर मार्गावर २ तासांच्या अंतरावर १६ किमी लांबीच्या पठारावर सुंदर फुले फुलतात.

मल्हारगड, पुणे

पुण्यावरून १ तासात दिवे घाट मार्गे येथे जाऊ शकता. स्वराज्यातील सर्वात शेवटी बांधलेला हा किल्ला आहे.

रोजा सोडताना खजूर का खातात?

येथे क्लिक करा