Monika Shinde
रोजा सोडताना खजूर खाण्याची एक जुनी परंपरा आहे. यामागे काही कारणे आहेत, जे शारीरिक, मानसिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत.
रोजा सोडताना शरीराला ऊर्जा कमी होऊ शकते, म्हणून खजूर खाणे उपयुक्त ठरते.
खजूरमध्ये फायबर्स असतात, जे पचन क्रिया सुधारतात. त्यामुळे खजूर खाल्ल्यानंतर पोट जड होण्याची समस्या कमी होते.
रोजा सोडताना शरीराची हायड्रेशन कमी होऊ शकते. खजूरमध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.
इस्लाम धर्मात, पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांनी रोजा तोडताना खजूर खाण्याची परंपरा दिली आहे.
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, आणि मिनरल्स असतात, जे शरीराच्या सामान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.