Saisimran Ghashi
आपल्याला चित्रपट निर्माता सैराट फेम नागराज मंजुळे तर माहिती आहेतच.
पण त्यांच्या पत्नीबद्दल अनेकांना माहिती नाहीये.नागराज मंजुळे यांनी एका मुलाखतीत त्यांची लव्हस्टोरी आणि पत्नीबद्दल खुलासा केला
नागराज मंजुळे यांच्या पत्नीचे नाव गार्गी कुलकर्णी आहे.
ते म्हणाले, 'माझी आणि गार्गी कुलकर्णी यांची भेट अहमदनगरमध्ये झाली'. गार्गीला वाचनाची आणि कवितांची विशेष आवड आहे.
त्या स्वतः उत्तम कविता लिहितात आणि साहित्याची चांगली समज आहे. पटकथा लिहिल्यावर नागराज त्या गार्गीला सर्वात आधी ऐकवतात.
नागराज म्हणाले, गार्गी मंजुळे यांच्या प्रत्येक क्रिएटिव्ह कामाचा भाग बनते. ती फक्त लेखिका नाही, तर एक सर्जनशील सहकारीही आहे.
नागराज मंजुळे गार्गीला "माझा आरसा" म्हणतात, हे त्यांच्या महत्त्वाचं प्रतीक आहे.