सूरज यादव
आफ्रिकेतील एका कोपऱ्यात असलेल्या इथियोपियात हायली गब्बी ज्वालामुखीचा १२ हजार वर्षांनी स्फोट झालाय. त्याची राख ४५०० किमी दूर असलेल्या भारतात राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
इथियोपियातील अफार परिसरात हायली गब्बी ज्वालामुखीचा स्फोट झाला असून त्याची राख अवकाशात तब्बल १४ किमी उंच राख पसरली होती.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
हायली गब्बी ज्वालामुखी इथियोपियातील अफार परिसरात आहे. एर्ता अले ज्वालामुखी साखळीतला हा दक्षिणेकडेचा भाग असून याला या भागाला पृथ्वीवरचा नरक असंही म्हटलं जातं. इथलं तापमान ५० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
भारतीय प्रमाणवेळेनुसार २३ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता या ज्वालामुखीचा स्फोट झाला. गेल्या १२ हजार वर्षांच्या काळात या ज्वालामुखीचा स्फोट झाल्याची नोंद नाहीय.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
ज्वालामुखीच्या स्फोटामुळे १४ किमी वरपर्यंत राख पसरली. ही राख अफदेरा गावावर पडली. यात कुणाचा मृत्यू झाला नसला तरी जनजीवनावर परिणाम झाला आहे. याचे दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
हायली गब्बी ज्वालामुखीच्या स्फोटाच्या ठिकाणापासून दिल्ली जवळपास ४५०० किमी दूर आहे. मात्र जेव्हा स्फोटाची राख १४ किमी वर जाते तेव्हा स्ट्रेटोस्फीयरमध्ये गेल्यानं जेट स्ट्रीम नावाच्या हवेच्या वेगानं पश्चिमेकडून पूर्वेकडे येते.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
२३ नोव्हेंबरला राख लाल समुद्र पार करून यमन-ओमानपर्यंत पोहोचली. त्यानंतर पाकिस्तान आणि राजस्थानमध्ये पोहोचली. २४ नोव्हेंबरच्या रात्री ही राख दिल्लीवर पसरली. जर हवा नसती तर राख ५० किमीपर्यंत पडली असतील.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
इथियोपियात ज्वालामुखीच्या स्फोटाचा लगेच धोका नाहीय पण दीर्घकालीन परिणाम चिंताजनक आहेत. राखेमुळे मातीची सुपिकता कमी होते. पाण्यात काचेचे कण मिसळल्यानं आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात.
Hayli Gabbi Volcano Erupts After 12000 Years
Esakal
Liver Cancer Symptoms & Risk Factors
Sakal