Aarti Badade
पार्टीत हातात ड्रिंक आणि उत्साहाचे वातावरण असते. पण 'आधी ड्रिंक मग जेवण' ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
side effects of drinking alcohol on an empty stomach
sakal
पोट रिकामे असताना दारू थेट छोट्या आतड्यातून रक्तप्रवाहात मिसळते. अन्नाशिवाय मद्यपान केल्यास नशा वेगाने चढते आणि शरीराला मोठा 'शॉक' बसतो.
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal
रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने मेंदूची विचार करण्याची क्षमता संपते. यामुळे ब्लॅकआउट, स्मरणशक्ती कमी होणे आणि शरीराचा तोल जाऊन अपघाताचा धोका वाढतो.
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal
यकृत दारू पचवण्याचे काम करते. अन्न नसल्यास यकृतावर अचानक दबाव येतो, ज्यामुळे पेशींचे नुकसान होते. पुढे जाऊन फॅटी लिव्हर किंवा सिरोसिसचा धोका निर्माण होतो.
जलद रक्ताभिसरणामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढतो. यामुळे हृदयाची धडधड अनियमित होऊन हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal
रिकाम्या पोटी अल्कोहोल घेतल्याने पोटाचे आतील अस्तर खराब होते. यामुळे तीव्र ॲसिडिटी, अल्सर आणि काही वेळा पोटांतर्गत रक्तस्त्राव (Bleeding) देखील होऊ शकतो.
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal
अशा सवयीमुळे स्वादूपिंडाला सूज येते (Pancreatitis). ही स्थिती अत्यंत वेदनादायक असून वेळीच उपचार न मिळाल्यास जीवावर बेतू शकते.
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal
ड्रिंक घेण्यापूर्वी थोडे प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा जेवण नक्की करा. भरपूर पाणी प्या आणि मर्यादेत राहा. नवीन वर्षाची सुरुवात आनंदात करा, हॉस्पिटलमध्ये नव्हे!
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal
Leg Cramps Warning
Sakal