Aarti Badade
पुण्यातील भरत नाट्य मंदिराजवळ, इमारतींमागे एक २०० वर्षांहून जुने विठोबा मंदिर लपलेले आहे. त्याला 'उपाशी विठोबा' म्हणतात.
चिमण्या गणपतीकडून भरत नाट्य मंदिराकडे जाताना, डावीकडे हे छोटे पण ऐतिहासिक मंदिर दिसते.
या विठोबाला 'उपाशी विठोबा' असे म्हणतात. कारण, सलग तीन पिढ्यांनी येथे उपासाचे व्रत केले.
वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरमे सराफांनी म्हातारपणी हे मंदिर बांधले. त्यांनी विठोबाला पुण्यातच आणले.
गिरमे सराफ उपवासाला फक्त वरई, भुईमूग आणि एक खारीक इतकाच आहार घेत होते.
काळ्या हौदाजवळ राहणारे नाना गोडबोले रोज मंदिरात भजन करत असत. त्यांनीही उपासाचे व्रत सुरू ठेवले.
गोडबोले यांच्यामागे टाळ वाजवणारे गंगाधरबुवा काळे नंतर मंदिराचे मालक झाले. त्यांनीही उपास करण्याची परंपरा पुढे चालवली.
गंगाधरबुवा काळेंचा आहार खूप साधा होता – ते फक्त ताक आणि लाह्यांचे पीठ खात असत!
गंगाधरबुवा काळेंनंतर रामभाऊ साठे यांच्याकडे मंदिराची जबाबदारी आली. त्यांनी ही परंपरा जपली.