Aarti Badade
पुण्यातील नाना पेठेतील 'निवडुंग्या विठोबा मंदिर' खूप प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात विठोबा दिसले आणि हे ठिकाण सापडले.
एका फड्या निवडुंगामध्ये विठोबाची मूर्ती सापडली. त्यामुळेच या विठोबाला 'निवडुंग्या विठोबा' असे नाव मिळाले.
नाना पेठेतील श्रीमंत गोसावी कुटुंबाने हे मंदिर बांधले. इ.स. १८३० मध्ये श्री. पुरुषोत्तमदास यांनी त्याची पुनर्बांधणी केली.
इ.स. १८५९ मध्ये पुरुषोत्तमदास यांनी आपली सर्व संपत्ती विठोबाच्या चरणी अर्पण केली. त्यांनी त्याबद्दल कायदेशीर नोंदणीही केली.
मंदिरात प्रवेश करताच काळ्या रंगाचे कासव दिसते. नामदेव महाराजांची पायरी आहे. डावीकडे संत चांगदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या भेटीचा देखावा आहे.
मंदिरात दोन्ही बाजूंना ओवऱ्या असलेला भव्य सभामंडप आहे. जयपूरहून आणलेल्या संगमरवरी संतांच्या मूर्ती येथे आहेत.
गाभाऱ्यात काळ्या दगडातील सुंदर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. त्यांच्याभोवती अनेक संत, गणपती, दत्त, राम-सीता, शंकर आणि मारुती यांच्याही मूर्ती आहेत.
संत तुकाराम आणि आनंदचैतन्य गुरूंची पालखी आषाढ वारीदरम्यान येथेच मुक्काम करते.
येथे संत ज्ञानेश्वर-चांगदेव यांच्या भेटीची शिल्पकथा आहे. जयपूरची कला दिसते आणि चांदीचा आकर्षक गरुड खांब लक्ष वेधून घेतो.