Aarti Badade
डोके आणि मानेचा कॅन्सर (Head and Neck Cancer) हा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. याची लक्षणे सुरुवातीला सामान्य आजारांसारखी वाटतात, ज्यामुळे निदान उशिरा होते.
Head & Neck Cancer Symptoms
Sakal
गिळताना त्रास होणे (Difficulty Swallowing) किंवा जळजळ जाणवणे, हे या कॅन्सरचे एक प्रमुख लक्षण असू शकते. तसेच, खाताना वेदना होणे हे देखील महत्त्वाचे चिन्ह आहे.
Head & Neck Cancer Symptoms
Sakal
या कॅन्सरची महत्त्वाची चिन्हे : आवाजात बदल किंवा सातत्याने घसा दुखणे. तोंडात न भरणारी जखम किंवा लाल/पांढरे डाग दिसणे. जबड्यात कडकपणा किंवा हालचालींची अडचण.
Head & Neck Cancer Symptoms
Sakal
मान किंवा जबड्यात गाठ (Lump in Neck) दिसणे. तसेच, चेहऱ्यावर सातत्याने वेदना, वजन कमी होणे, कानात वेदना किंवा कमी ऐकू येणे याकडे दुर्लक्ष करू नका.
Head & Neck Cancer Symptoms
Sakal
हा कॅन्सर होण्याचा सर्वात मोठा धोका खालील घटकांमुळे वाढतो : तंबाखू सेवन, गुटखा किंवा पान-तंबाखू चघळण्याची सवय. मद्यपान (Alcohol Consumption). एचपीव्ही व्हायरस (HPV Virus) आणि खराब दंतस्वच्छता.
Head & Neck Cancer Symptoms
Sakal
याशिवाय, वयोमान, किरणोत्सर्गाचा संपर्क आणि आहारात फळे-भाज्या कमी असणे, यामुळेही या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
Head & Neck Cancer Symptoms
sakal
जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित तपासणी आणि वेळेवर निदान (Early Diagnosis) जीव वाचवू शकते.
Head & Neck Cancer Symptoms
Sakal
Winter Digestion Tips
Sakal