कोहळा शरीरासाठी का आहे अमृतसमान? आयुर्वेदातील या फळाचे जाणून घ्या जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

कोहळा का आहे शरीरासाठी अमृतसमान?

उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराला आराम देणारा आणि चवीलाही तितकाच अप्रतिम वाटणारा पदार्थ म्हणजे कोहळ्याचा पेठा. जसा आग्र्याचा ताजमहाल जगप्रसिद्ध आहे, तसाच कोहळ्यापासून बनवलेला पेठाही गोड-खवय्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

Ash Gourd Benefits | esakal

कोहळा म्हणजे काय?

कोहळा (Ash Gourd) ही एक वेलीवर उगम पावणारी फळभाजी आहे, जी आयुर्वेदात 'शीत' गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. हाच थंडावा रक्तातील उष्णता कमी करण्यास मदत करतो.

Ash Gourd Benefits | esakal

त्वचेच्या विकारावर कोहळा अत्यंत उपयोगी

विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत नाकातून रक्त पडणे, उष्णतेमुळे चिडचिड किंवा त्वचेचे विकार यावर कोहळा अत्यंत उपयोगी आहे.

Ash Gourd Benefits | esakal

शरीराला मिळतो नैसर्गिक ओलावा

कोहळ्यात जवळपास ९६.५ टक्के पाण्याचे प्रमाण असल्याने, तो शरीराला आवश्यक असलेला ओलावा आणि थंडावा प्रदान करतो. मात्र लक्षात घ्या, कोहळ्याचा पेठा करताना त्यातील पाणी काढले जाते, त्यामुळे आरोग्य लाभासाठी कोहळ्याचा रस थेट पिणे अधिक फायदेशीर ठरते.

Ash Gourd Benefits | esakal

निद्रानाशावर आणि पचनावरही उपाय

कोहळा केवळ थंडावा देणारा नाही तर निद्रानाश, वाईट स्वप्नं, मलावरोध व मूत्र जळजळ यासारख्या त्रासांवरही प्रभावी आहे. त्याचा नियमित वापर मूत्राशय स्वच्छ ठेवतो, लघवी स्वच्छ होते आणि पचनक्रिया सुधारते.

Ash Gourd Benefits | esakal

पोषणासाठी उपयुक्त

कोहळा हा बलवर्धक, वीर्यवर्धक आणि हृदय व केसांसाठी पोषक असल्याचे आयुर्वेद सांगते. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर परिणाम करणाऱ्या मोजक्या घटकांमध्ये कोहळा अग्रस्थानी आहे.

Ash Gourd Benefits | esakal

पेठा आणि गुलाब पाकळ्यांचे अनोखे कॉम्बिनेशन

उत्तर भारतात कोहळ्याचा पेठा गुलाब पाकळ्यांसोबत खाण्याची परंपरा आहे. हे संयोजन शरीरात थंडावा वाढवते आणि चवीलाही अप्रतिम असते.

Ash Gourd Benefits | esakal

अनेक समस्यांवर घरगुती उपाय

थोडक्यात सांगायचं झालं, तर कोहळा हे गोडसर, थंडावादायक आणि आरोग्यवर्धक फळ असून उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर घरगुती उपाय ठरू शकतो. त्याचा पेठा खाण्यासाठी तर रस पिण्यासाठी जरूर विचार करा!

Ash Gourd Benefits | esakal

Kadvanchi Health Benefits : पावसाळ्यात उगवणारी 'ही' औषधी वनस्पती निसर्गदत्त आरोग्याचं आहे अमूल्य वरदान!

Kadvanchi Health Benefits | esakal
येथे क्लिक करा..