सकाळ डिजिटल टीम
जांभळाची पाने देखील पोषणमूल्यांनी समृद्ध असून अनेक आरोग्यवर्धक फायदे देतात. आयुर्वेदामध्ये जांभळाच्या पानांचा वापर मधुमेह, पाचनतंत्र, दात आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त असल्याचं म्हटलंय.
जांभळाच्या पानांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषक तत्वे असतात, जसे की.. :
व्हिटॅमिन C आणि A
फोलेट
कॅल्शियम आणि लोह (Iron)
फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम
जांभळाची पाने नियमितपणे चघळल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. या पानांमध्ये असलेली बायो-अॅक्टिव्ह संयुगे (bioactive compounds) शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी २ ताजी पाने चघळावीत.
हे पाने चघळल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. नियमित सेवनाने पोटाशी संबंधित त्रास जसे की अपचन, गॅस इत्यादींवर नियंत्रण ठेवता येते.
जांभळाची पाने चघळल्याने दात स्वच्छ, चमकदार होतात आणि हिरड्यांची सूज कमी होते. तसेच, तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होते.
जर तुम्हाला तुमचे वजन कमी किंवा नियंत्रित ठेवायचे असेल, तर हे पाने नियमित चावणे फायदेशीर ठरते. यामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असून ते चयापचय क्रिया सुधारते.
सकाळी रिकाम्या पोटी २ ताजी पाने घ्या
स्वच्छ पाण्याने धुवा
हळूहळू चावा
रस गिळावा आणि पानाचा तंतुमय भाग नंतर थुंकावा
कोणतेही नैसर्गिक उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, विशेषतः जर तुम्ही मधुमेहासाठी औषधे घेत असाल.