Sandeep Shirguppe
जेवल्यानंतर खाऊचे पान (Betel Leaf) खाण्याच्या अनेकांना मोह आवरत नाही. यात अनेक आरोग्यदायी घटक आहेत.
आयुर्वेदात खाऊच्या पानांना अनन्य साधारण महत्व आहे. यातील युरिक अॅसिडमुळे पचन सुधारते.
खाऊच्या पानात टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइड्स आणि फिनाइल सारखे अनेक पोषक घटक आढळतात.
फायबरचे प्रमाण खाऊच्या पानात जास्त असल्याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
हिरड्यांवर सूज येणे, किंवा त्यातून रक्त निघणे, यासह इतर समस्या असतील तर नक्की खाऊचे पान खायला हवं.
हिवाळ्यात सर्दी, खोकला, इन्फेक्शनचा त्रास होत असले तर रोज एक खाऊचे पान चघळा फरक जाणवेल.
पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
खाऊच्या पानांमध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.