नारळाचं पाणी की मलई? कोणतं आहे जास्त फायदेशीर

Monika Shinde

उन्हाळा सुरु झाला

उन्हाळा सुरु झाला असून अनेकजण नारळपाणी आणि त्यातील मलाई आवडीने खातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या दोन पैकी कोणतं जास्त आरोग्याला फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया

नारळपाणी

नारळपाण्यामध्ये व्हिटॅमिन C, B, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

फायदे

शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यात उपयुक्त आहे तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

नारळपाण्याची मलई

नारळपाण्याची मलईमध्येही फायबर आणि आरोग्यदायी फॅट्स तसेच ऑक्सिडंट्स आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

मलईचे फायदे

मलाई खाल्याने पचन सुधारते आणि त्वचेला पोषण मिळते तसेच केस मजबूत होतात

दोन्हींपैकी काय फायदेशीर?

नारळपाणी आणि त्याची मलई दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण त्यांचे फायदे वेगवेगळे असतात.

तुमच्यासाठी काय योग्य?

दोन्ही गोष्टी फायद्याच्या असल्या तरी, प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे.

टीप

ज्यांना किडनीचे आजार, मधुमेह, इतर वैद्यकीय समस्या असल्यास त्यांनी नारळपाणी किंवा मलई घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महाराष्ट्राचे पूर्वीचे नाव?

येथे क्लिक करा