Monika Shinde
रोज फक्त ४०–४५ मिनिटं नियमित चालल्यास तुमचं आरोग्य उत्तम राहू शकतं आणि त्याचे अनेक फायदेही मिळतात
दररोज चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
चालणे हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. तसेच कॅलरी बर्न करून फॅट कमी करण्यास मदत होते.
चालणे म्हणजे नैसर्गिक स्ट्रेस बस्टर आहे. आणि डिप्रेशन, ताणतणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.
नियमित चालणाऱ्यांना शांत आणि गाढ झोप येते. अनिद्रा असलेल्या व्यक्तींसाठी चालणे उपयोगी.
चालल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. टाईप २ डायबेटीस असलेल्यांसाठी अत्यंत फायदेशीर.
चालण्यामुळे सांधे लवचिक राहतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
दररोज ४०–४५ मिनिटं चालणाऱ्या व्यक्तींचे आयुर्मान वाढते आणि जीवनशैली आरोग्यदायी राहते.