सकाळ डिजिटल टीम
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे अन्न नीट पचते आणि गॅस, अॅसिडिटी कमी होते.
तांब्याच्या जंतुनाशक गुणधर्मांमुळे शरीर संसर्गाशी चांगल्या प्रकारे लढते.
तांबे कोलेजन तयार करण्यात मदत करतो, ज्यामुळे सांधे लवचिक व मजबूत राहतात.
तांबे त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण संतुलित ठेवतो, त्यामुळे त्वचा तेजस्वी राहते आणि सुरकुत्या कमी होतात.
तांब्याचे अँटीऑक्सिडंट्स पेशींना नुकसानापासून वाचवतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
तांबे लोहाचे शोषण सुधारतो, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.
शरीरात तांब्याची कमतरता असल्यास हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो. तांबे योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तदाब सुरळीत राहतो.
तांब्याचे पाणी शरीराची चरबी जाळण्याची क्षमता वाढवते, तेही तुम्ही विश्रांतीत असताना.