Sandeep Shirguppe
रोज मुठभर शेंगदाणे खाल्ल्याने प्रथिने, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि भरपूर खनिजे मिळतात.
खराब कोलेस्ट्रॉल दूर करणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स शेंगदाण्यात असतात.
प्रथिने, चरबी आणि फायबरचा चांगला स्रोत शेंगदाण्यात असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
शेंगदाण्यामध्ये झिंक आणि सेलेनियमसारखी खनिजे असतात, यामुळे रोगप्रतिकार वाढते.
शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात.
मँगनीज आणि फॉस्फरसची उच्च सामग्री शेंगदाण्यामध्ये असते.
शेंगदाण्यात असलेले जीवनसत्त्वे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.
शेंगदाणे खाताना योग्य प्रमाणात खावे, कारण ते कॅलरी-दाट असतात. काही लोकांना शेंगदाण्यांची ऍलर्जी असू शकते.