Sandeep Shirguppe
काळीमिरी आणि मध एकत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत. गंभीर आजारांवर खूप उपयुक्त आहे.
तुम्हाला नियमीत सर्दी आणि खोकल्याचा त्रास असेल तर काळीमिरी आणि मध खायला सुरू करा.
मध आणि काळीमिरी दोन्हीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात.
अन्न पचनाच्या समस्या असतील तर तूम्ही आवर्जून काळीमिरी आणि मध खा, पाचक एन्झाईमची क्रिया वाढते.
काळ्यामिरीमधील पाईपरीन चयापचय क्रिया वाढवते, ज्यामुळे कॅलरी बर्न होतात.
मध त्वचेला मॉइश्चरायझ (moisturize) तर काळीमिरी दाहक-विरोधी (anti-inflammatory) असल्याने त्वचेची जळजळ कमी होते.
मध नैसर्गिक साखर आहे, जी शरीराला ऊर्जा देते, तर काळीमिरी शरीराला ऊर्जावान बनवते.
काळीमिरी आणि मध रोज सकाळी व्यायामानंतर खाल्ल्यास दिवसभर ताजे तवाने वाटेल.