काळी मैना खाण्याचे आहेत 'हे' 6 आरोग्यदायी फायदे

Monika Shinde

काळी मैना

काळी मैना या फळाला करवंद, रानमेवा किंवा डोंगराची काळी मैना असेही म्हंटले जाते.

आरोग्याच्या दृष्टिने

डोंगराची काळी मैना म्हणून ओळखले जाणारे करवंद हे लहान, काळ्या रंगाचे फळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे.

जंगलात

सहसा याची झाडं जंगलात आणि डोंगरकड्यांवर आढळतात. काळी मैना चवीलाही आंबट-गोड असून त्यात भरपूर पोषणमूल्यं असतात. चला तर जाणून घेऊयात हे फळ खाण्याचे फायदे काय आहेत.

त्वचेसाठी फायदेशीर

काळी मैना त्वचेसाठीही उपयुक्त आहे. यात असलेले खनिजे त्वचेला पोषण देतात, डाग कमी करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.

केसांची गुणवत्ता सुधारते

काळी मैना केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात असलेले खनिजे केसांच्या मुळांना पोषण देतात, केसांची वाढ आणि केस गळणे कमी करते.

वजन कमी करण्यास मदत करते

काळी मैना नैसर्गिक डाय्युरेटिक आहे, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे सूज कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

पचनशक्ती सुधारते

उन्हाळयात जास्त प्रमाणात गॅसची समस्या उद्भवतात. जर तुम्ही रोज काळी मैना खाले तर पचनक्रिया सुधारते, गॅस, अपचन आणि पोट फुगण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळते.

साखरेचे प्रमाण नियंत्रित करते

काळी मैना मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. यात असलेले खनिजे, विशेषतः लोह आणि मॅग्नेशियम, शरीरातील इन्सुलिन पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

तसेच

तसेच कॅन्सर, उष्णतेच्या विकारावरही काळी मैना बेस्ट आहे.

उन्हाळ्यात मधुमेह रुग्णांनी 'हे' पदार्थ खाणे टाळा

येथे क्लिक करा