Yashwant Kshirsagar
भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात साखर कुठल्या न कुठल्या स्वरुपातच असते.
साखरेचा वापर मिठाईपासून ते सकाळ-संध्याकाळच्या चहापर्यंत अनेक पदार्थांत होतो.
साखर शरीराला हानिकारक असते तरी आपण रोज कोणत्या कोणत्या न पदार्थात ती खातो, एवढंच नाही तर प्रमाणापेक्षा जास्त खातो.
पण गूळ हा साखरेला आरोग्यदायी पर्याय म्हणून ओळखला जातो. एवढंच नाही तर हे हेल्दी फूड देखील मानले जाते.
पण जर तुमच्या डायटमध्ये गूळ असेल तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्हींही जाणून घेणे गरजेचे आहे.
गुळामुळे पदार्थाला फक्त गोडीच येत नाही तर पोषक घटकांचे भांडार आहे. साखरेत फक्त कॅलरीज असतात तर गुळात लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शियम असते.
साखरेऐवजी गुळाचे सेवन केले तर पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि वजन नियंत्रण करण्यात देखील मदत होते.
साखरेच्या तुलनेत गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो पण रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे मधुमेहींनी गूळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.