Sandeep Shirguppe
तोंडाची दुर्गंधी, दात दुखीसह अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी लवंग उपयुक्त आहे.
लवंगात असलेले युजेनॉल नावाचे संयुग दातदुखी कमी करण्यास मदत करते.
लवंग तोंडातील जीवाणू आणि बुरशी नष्ट करते, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण लवंगात असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
काही अभ्यासांनुसार, लवंग रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते.
लवंग पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि पोटातील समस्या दूर करते.
लवंगात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होतो.
काही लोकांना लवंगची ऍलर्जी येऊ शकते. यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लवंग खावावे.