Anushka Tapshalkar
लालसर-जांभळ्या सालीचं हे केळं प्रामुख्याने केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये उगम पावलेलं असून त्याची चव गोडसर आणि बेरीसारखी असते.
लाल केळ्यांमध्ये बेटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन C भरपूर असते, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
त्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतं आणि हृदयाचं कार्य सुधारतं, त्यामुळे ते हृदयासाठी फायदेशीर आहे.
या केळ्यातील फायबर पचन सुधारतं, बद्धकोष्ठता दूर करतं आणि आंतड्यांचं आरोग्य राखतं.
लाल केळं हे कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असल्याने लगेच ऊर्जा देतं, विशेषतः वर्कआउटपूर्वी खाण्यास योग्य आहे.
फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
व्हिटॅमिन B6 आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तेजस्वी, निरोगी आणि तरुण राहते.
लाल केळं हे व्हिटॅमिन A आणि लुटिनचा स्रोत आहे, जे दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांचे विकार टाळण्यास मदत करतं.
लाल केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात ते उपयुक्त ठरतं.