Anushka Tapshalkar
बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसाचा वेग वाढला आहे. अशातच मानसिक, भावनिक आणि शारीरिक संतुलन पुन्हा मिळवणं फार गरजेचं ठरतं. पण त्यासाठी मोठे बदल न करता दररोजच्या लहान सवयी प्रभावी ठरु शकतात.
रात्री झोपेत जीभेवर टॉक्सिन्स साचतात. सकाळी उठून सर्वात आधी जीभ स्वच्छ केल्याने पचन सुधारते आणि मन स्पष्ट होते.
उठल्यानंतर ३०-६० मिनिटांत सूर्यप्रकाशात थोडा वेळ थांबा. हे नैसर्गिकरित्या सेरोटोनिन वाढवतं आणि कॉर्टिसोल कमी करतं जे कॉफीपेक्षाही प्रभावी आहे!
दिवसातील एक काम जाणीवपूर्वक हळूहळू करा – जसं की कपडे घालणे, कपड्यांची घडी घालणे, चहा बनवणे किंवा भाज्या चिरणे. यामुळे जागरूकता वाढते.
दुपारच्या वेळेस पचनशक्ती सर्वाधिक असते. त्यामुळे तुमचं सर्वात जड जेवण दुपारीच करा. रात्री हलकं जेवण ठेवा.
पायांच्या तळव्यांमध्ये महत्त्वाचे नाडीबिंदू असतात. गरम तेलाने २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यास झोप सुधारते आणि तणाव कमी होतो.
४ सेकंद श्वास आत, ८ सेकंद श्वास बाहेर – हा श्वासोच्छ्वासाचा पॅटर्न मन शांत करतो आणि तणाव कमी करतो. दिवसातून कधीही याचा ५ वेळा सराव करा.
संध्याकाळी दिवा लावणं हा ‘करण्याच्या’ अवस्थेतून ‘असण्याच्या’ अवस्थेत जाण्याचा संकेत असतो. हे आपल्याला आतून शांत करतं.