Yashwant Kshirsagar
शेंगदाण्यांमध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने हाडांशी संबंधित समस्या कमी होतात.
भिजवलेले शेंगदाणे हृदयासाठी देखील खूप चांगले असतात, यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतात.
भिजवलेले शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस आणि एसिडिटी कमी होऊ शकते.
यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते.
भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅंटिआॅक्सीडेंट्स असतात जे आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असते.
भिजवलेले शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्याने पाठीचा त्रास कमी होऊ शकतो.
सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने मुले आणि प्रौढांची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.