Yashwant Kshirsagar
अननस हे जगातील सर्वात स्वादिष्ट फळांपैकी एक आहे. १७ व्या शतकाच्या मध्यात ब्रिटिश राजेशाहीत अननसाला 'फळांचा राजा' म्हणून घोषित करण्यात आले होते.
अननसाची चव चांगली असून आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि एंजाइमसारखे पोषक घटक असतात.
अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
पण काही लोकांसाठी अननस हे विष ठरु शकते, त्यामुळे ते कोणी खाऊ नये याबद्दल जाणून घेऊया.
ज्यांना अननसाची अॅलर्जी आहे, त्यांनी अननस खाऊ नये. अॅलर्जीची लक्षणे खाज, पुरळ, सूज, किंवा श्वासोच्छ्वासाला त्रास यांचा समावेश होतो.
ज्यांना पोटाचे आजार आहेत (उदा. आम्लपित्त, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या), त्यांनी अननस खाणे टाळावे, कारण अननस पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकतो.
ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी अननस कमी प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे, कारण अननसात नैसर्गिकरित्या साखर असते.
अननसातील पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ते फायद्याचे असू शकते, पण जास्त प्रमाणात अननस खाल्ल्यास रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.
गरोदर महिलांनी अननस खाणे टाळावे, कारण अननसातील ब्रोमेलेन गर्भाशयाचे आकुंचन करू शकते, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो.