रोज सकाळी १० मनुके खाल्ले तर काय होते?

सकाळ डिजिटल टीम

दररोज १० मनुके

दररोज फक्त १० भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. योग्य पद्धतीने मनुके खाल्ल्यास आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतात.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

बद्धकोष्ठता

पोट साफ होत नसेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर मनुक्यांचा आहारात समावेश करा. भिजवलेले १० मनुके खाल्ल्याने शौचास मऊ होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

आतड्यांचे आरोग्य

मनुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि सॉर्बिटॉल असते. हे घटक आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून पचनक्रिया अधिक सुधारतात.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी

डायबिटीज असलेल्यांनी बिस्किट किंवा नमकीनऐवजी ८ ते १० मनुके खावेत. मनुक्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असल्याने कधीतरी गोड म्हणून हे खाणे सुरक्षित ठरते.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

दातांच्या आरोग्यासाठी आणि हिरड्यांसाठी

मनुके गोड आणि चिकट असल्याने कॅव्हिटी होते हा गैरसमज आहे. मनुक्यांमधील ओलेनोलिक ॲसिड दातांमधील कॅव्हिटी रोखते आणि हिरड्या मजबूत बनवते.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

सकाळी रिकाम्या पोटी

दररोज रात्री ८ ते १० मनुके पाण्यात भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यावे आणि भिजवलेले मनुके नीट चावून खावेत.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

नैसर्गिक ऊर्जा

सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला दिवसभरासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

निरोगी जीवनशैली

महागड्या औषधांऐवजी रोजच्या आहारात भिजवलेल्या मनुक्यांचा समावेश करणे हा पचन आणि एकंदरीत आरोग्यासाठी अतिशय सोपा व नैसर्गिक उपाय आहे.

Eating 10 soaked raisins daily

|

sakal 

औषधांशिवाय मासिक पाळी रेग्युलर कशी करावी? 'या' ५ चुकांमुळे पाळी लांबत आहे का?

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

आणखी वाचा