सकाळ वृत्तसेवा
अंजीर हे एक चवदार आणि पौष्टिक फळ आहे. चला तर मग त्याच्या फायद्याबद्दल जाणून घेऊया
अंजीरमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. जे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करते.
अंजीरमध्ये फायटोएस्र्टोजेन असते. जे महिलांमधील हार्मोनलचा बदल संतुलित राखण्यास मदत करते.
अंजीरमध्ये कॅल्शियम आणि व्हीटॅमिन के असते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्याचा तजेलदारपणाही वाढतो,
अंजीरमध्ये पोटॅशियम असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच ह्रद्यविकाराचा धोका कमी करते.