Green Beans Benefits : अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी लाभदायी आहे फरसबी

Monika Lonkar –Kumbhar

फरसबी

हिरव्या भाज्यांमध्ये लाभदायी असणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी फरसबी ही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये फरसबीचा आवर्जून वापर केला जातो. ज्यामुळे, पदार्थाची चव आणखी वाढते. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

फरसबीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

वजन कमी होते

फरसबीमध्ये फायबर्स आणि मुबलक पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते. जे वजन कमी करण्यास मदत करते.

पचनसंस्था सुरळीत राहते

फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्सचा समावेश आढळून येतो. त्यामुळ, फरसबीचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था संतुलित आणि निरोगी राहण्यास मदत होते. 

आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते

फरसबीमध्ये असलेल्या फायबर्स आणि व्हिटॅमिन्समुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.

हाडांना मिळते बळकटी

फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि कॅल्शिअमचा समृद्ध स्त्रोत फरसबीमध्ये आढळून येतो. त्यामुळे, फरसबीमधील या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. 

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' खाद्यपदार्थ

food items | esakal