सकाळ डिजिटल टीम
फणस हे एक हंगामी फळ असून अनेकांना ते अत्यंत आवडते. चविष्ट असण्याबरोबरच हे फळ पोषणमूल्यांनी भरलेले आहे. त्यामुळे फणस केवळ चवीनिमित्त न खाता, आरोग्यासाठी देखील नक्कीच खावे.
फणसामध्ये भरपूर प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. डॉक्टरांच्या मते, शाकाहारी लोकांसाठी फणस हे एक उत्तम पर्याय ठरू शकते. याचे नियमित सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि मांसाहाराचा पर्यायही मिळतो.
फणसाचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हे फळ फायदेशीर ठरते.
फणस हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उच्च कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींनी याचा समावेश आहारात करणे फायदेशीर ठरते.
या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि विविध संसर्गांपासून संरक्षण करते.
फणस फायबरने समृद्ध आहे. त्यामुळे ते पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठता व इतर पचनसंस्थेच्या तक्रारी दूर करण्यास मदत करते.