जांभूळ खाण्याचे 'हे' 5 आहेत आरोग्यदायी फायदे

Monika Shinde

जांभूळ

जांभूळ हे उन्हाळा आणि पावसाळ्यात मिळणारं लहान काळसर-जांभळ्या रंगाचं फळ आहे.

चव

याची चव गोडसर आणि थोडीशी तुरट असते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत.

मधुमेहावर नियंत्रण

जांभळामध्ये असे घटक असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी जांभूळ खूप फायदेशीर आहे.

पिंपल्स दूर करते

दररोज ५ ते ६ जांभूळ खाल्ल्याने किंवा त्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने तेलकटपणा कमी होतो आणि पिंपल्स कमी होतात.

पचन सुधारतो

जांभूळ खाल्ल्याने पोट साफ राहते आणि पचन व्यवस्थित होतं. ज्यांना अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी हे फळ उपयोगी आहे.

हृदय निरोगी ठेवतो

जांभळामध्ये पोटॅशियम असतं, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

रोगांपासून संरक्षण

जांभळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असतं, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारखे आजार लांब राहतात

टीप

जांभळाचं रोज थोड्या प्रमाणात सेवन आरोग्यासाठी चांगलं आहे. पण काही आरोग्य समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हार्ट अटॅकपासून कायमची मुक्ती? नव्या इंजेक्शनमुळे औषधांपासून सुटका

येथे क्लिक करा