Monika Shinde
हार्ट अटॅकचं नाव जरी काढलं तरी अनेकांना भीती वाटते... मात्र आता फक्त एक इंजेक्शन हार्ट अटॅकचा धोका टाळू शकतं. नेमकं हे इंजेक्शन काय आहे आणि कसं कार्य करतं? पाहूया!
हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलने तुम्हालाही सतत चिंता लागून राहिली आहे का? मग ही नवी वैज्ञानिक क्रांती तुमच्यासाठी दिलासादायक ठरू शकते.
संशोधकांनी असं एक इंजेक्शन विकसित केलं आहे, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) ला लक्षणीयरीत्या कमी करू शकतं
शास्त्रज्ञांनी विकसित केलंय ‘VERVE-102’ नावाचं एक विशेष इंजेक्शन.
‘VERVE-102’ नावाचं हे नवीन इंजेक्शन शरीरात जाऊन थेट ज्या जनुकांमुळे कोलेस्ट्रॉल वाढतो त्यावर परिणाम करतं.
VERVE-102 हे इंजेक्शन सध्या चाचणी टप्प्यावर असून आता पर्यंत 14 रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे.
स्टॅटिन्सप्रमाणे रोज गोळ्या घ्यायची गरज नाही फक्त एक डोस पुरेसा!
LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल झपाट्यानं कमी होतं आणि हृदय अधिक सुरक्षित राहतं.
वारीला निघालात? निरोगी वारीसाठी लक्षात ठेवा 'हे' खास टिप्स