सकाळ डिजिटल टीम
जास्वंदाच्या फुलाचे आनेक आरोग्य आणि सौंदर्यासाठी महत्त्वाचे फायदे आहेत. ते काणते जाणून घ्या.
जास्वंदाच्या फुलांचा वापर केसांसाठी खूप फायदेशीर असतो. केसांच्या वाढीस मदत करणे, केस गळती थांबवणे, कोंडा कमी करणे आणि केसांना नैसर्गिक चमक देणे यासाठी याचा उपयोग केला जातो.
जास्वंदाच्या फुलांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात. ते त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात, त्वचा स्वच्छ ठेवतात आणि नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतात.
जास्वंदाचा चहा (Hibiscus Tea) उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले घटक रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.
जास्वंदामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सामान्य सर्दीसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी ते उपयुक्त मानले जातात.
जास्वंदाच्या चहामुळे चयापचय क्रिया (Metabolism) सुधारते. हे वजन कमी करण्यास मदत करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
काही संशोधनानुसार, जास्वंद यकृताला हानीपासून वाचवते आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करते.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी जास्वंदाचा वापर केला जातो.
जास्वंदाच्या फुलांमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) नैसर्गिकरित्या नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात आणि मन शांत ठेवतात.