Benefits Of Mango : फळांचा राजा आहे आंबा, त्यात लपलाय आरोग्याचा खजिना

Monika Lonkar –Kumbhar

आंबा

फळांचा राजा आंबा हा चवीने खाल्ला जातो. उन्हाळा सुरू झाला की, सर्व जण या फळाची आवर्जून वाट पाहत असतात.

चवीला अतिशय गोड असणारा हा आंबा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि पोटॅशिअम इत्यादी पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आंब्याला व्हिटॅमिन सी चा प्रमुख स्त्रोत मानले जाते. त्यामुळे, विविध संसर्गांपासून शरीराचे संरक्षण होते. त्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य

आंबा बीटा-कॅरोटीनचा एक उत्तम स्त्रोत असल्यामुळे, डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

आंबा पोटॅशिअमचा एक चांगला स्रोत आहे. त्यामुळे, हृदयाच्या आरोग्यासाठी आंबा हे फळ फायदेशीर ठरू शकते.

पचनक्षमता सुरळीत राहते

आंब्यामध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. या फायबर्समुळे पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते.

लालचुटुक स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी आहे फायदेशीर