सकाळ डिजिटल टीम
पुदीना पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पोटातील गॅस, अपचन आणि पोटदुखी कमी करण्यासाठी पुदीना प्रभावी आहे.
पुदीना उलट्या रोखण्यासाठी उपयोगी आहे. पुदीना पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास मळमळ आणि उलट्यांपासून आराम मिळतो.
पुदीन्याची पेस्ट जखमेवर किंवा कीटकांच्या चाव्यांवर लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात.
पुदीना रस, कोमट पाणी आणि मध मिसळून पिण्याने पोटाचे आरोग्य सुधारते.
पुदीना, मिरपूड, आणि काळे मीठ उकळून चहा प्यायल्याने सर्दी, खोकला आणि ताप कमी होतो.
ताज्या पुदीना पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.
पुदीना पावडर तोंडाची दुर्गंधी दूर करते आणि हिरड्यांना मजबूत बनवते.