Neem Benefits : आरोग्यासाठी फायदेशीर आहे कडुलिंब, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

कडुलिंब

चवीला कडू असणारे कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

गुढीपाडवा

हिंदू धर्मामध्ये कडुलिंबाला विशेष असे महत्व आहे. गुढीपाडव्याचा सण कडुलिंबाशिवाय अपूर्ण आहे. गुढीपाडव्याला या पानांची पूजा केली जाते आणि गुळासोबत कडुलिंबाचे पान खाल्ले जाते.

कडुलिंबाच्या पानांचा वापर करून तुम्ही निरोगी रस बनवू शकता. कडुलिंब हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे, कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळल्या जाऊ शकतात.

मधुमेह

कडुलिंबाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पचनासाठी फायदेशीर

कडुलिंबाच्या पानांमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. जे पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले पोषकघटक आपली रोगप्रितकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात.

यकृत निरोगी राहते

कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृताचे आरोग्य निरोगी राहू शकते.

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'हे' योगासन

Benefits of Uttanasana | esakal