सकाळ डिजिटल टीम
मटार हा हिवाळ्यात ताजा असून तो खाणे अतिशय आरोग्यदायी आहे.
मटारमध्ये भरपूर फायबर असतो, जो वजन कमी करण्यास मदत करतो. सकाळी नाश्त्यात मटार खाल्ल्यानं दिवसभर ऊर्जा मिळते.
मटारमध्ये व्हिटॅमिन K भरपूर असतो, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. ऑस्टियोपोसिसचा धोकाही कमी होतो.
मटारच्या घटकांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. ट्रायग्लिसराईस आणि इतर आजारांपासून बचाव होतो.
लोह, झिंक, मॅग्नीज आणि कॉपर यासारख्या पोषक घटकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अँटीऑक्सिडंटमुळे शरीरावर रोगांचा प्रभाव कमी होतो.
हृदयरोगामुळे ग्रस्त लोकांसाठी मटार उपयुक्त ठरतो. हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
मटारमधील व्हिटॅमिन सीमुळे केसगळती थांबते. केस मुलायम आणि मजबूत होतात, आणि रक्त पेशी तयार होण्यास मदत होते.