Pistachios Benefits : दररोज पिस्ता खाल्ल्याने शरीरात होतात चमत्कारिक बदल! जाणून घ्या जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

हृदयापासून पोटापर्यंत सर्वांसाठी वरदान

सुकामेवा नेहमीच आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. तो केवळ खाण्यास स्वादिष्ट नसतो, तर शरीराला अनेक पोषक घटकही प्रदान करतो. गंभीर आजारांवरही उपयोगी पडणाऱ्या सुकामेव्यांपैकी पिस्ता अत्यंत लाभदायक मानला जातो.

Pistachios Benefits

| esakal

पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

दररोज पिस्ता खाल्ल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. पिस्तामधील पोषक घटक कोणते आणि ते कशाप्रकारे उपयोगी आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

Pistachios Benefits

| esakal

पिस्तामधील पोषक घटक

पिस्तामध्ये व्हिटॅमिन B6, थायमिन, पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियम, मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

Pistachios Benefits

|

esakal

पोटाच्या समस्या दूर होतात

ज्यांना वारंवार पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी पिस्ताचा आहारात समावेश नक्की करावा. यात भरपूर फायबर असल्यामुळे पचन सुधारते आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.

Pistachios Benefits

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

पिस्तामध्ये व्हिटॅमिन C असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि आजारांपासून संरक्षण देते.

Pistachios Benefits

|

esakal

जळजळ कमी होते

पिस्तामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत होते.

Pistachios Benefits

| esakal

हृदय निरोगी ठेवते

अनेक लोक आजकाल हृदयविकारांनी त्रस्त आहेत. हृदय निरोगी ठेवण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात पोटॅशियम मुबलक असते जे हृदयाच्या कार्यांना मदत करते.

Pistachios Benefits

|

esakal

पिस्ता कमी प्रमाणात खा

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारकच असतो. पिस्ता जरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असला तरी त्याचे अतिसेवन टाळावे. जास्त प्रमाणात पिस्ता खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

टीप : दररोज 10–15 पिस्ता खाणे पुरेसे आहे. दूध किंवा स्नॅकसोबत सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

Pistachios Benefits

|

esakal

Spinach Side Effects : जास्त पालक खाणं ठरू शकतं धोकादायक! 'हे' आजार वाढू शकतात, आत्ताच घ्या काळजी!

Spinach Side Effects

|

esakal

येथे क्लिक करा...