Red Guava Benefits : लाल पेरूमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

पेरू

पांढरा पेरू खायला तर सगळ्यांनाच आवडते. परंतु, हा चवीला गोड लागणारा पेरू आपल्या आरोग्यासाठी देखील तितकाच फायदेशीर आहे.

लाल पेरू

पांढऱ्या पेरूसारखाच लाल पेरू देखील सगळ्यांना खायला आवडतो. पांढऱ्या पेरूप्रमाणेच लाल पेरूचे देखील आरोग्याला अनेक फायदे आहेत.

लाल पेरू

लाल पेरूमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, चवीला गोड लागणाऱ्या या लाल पेरूचे फायदे कोणते? ते जाणून घेऊयात.

मधुमेह राहतो नियंत्रणात

पांढऱ्या पेरूच्या तुलनेत लाल पेरूमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे, लाल पेरूचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

सर्दी-खोकल्यावर प्रभावी

लाल पेरूमध्ये असलेल्या बिया सर्दी-खोकल्यावर प्रभावी ठरतात. त्यामुळे, लाल पेरू खाताना त्याच्या बियांचे देखील सेवन करा.

लोहाची कमतरता दूर होते

लाल पेरूचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते आणि शरीराला लोहाचा पुरवठा होतो.

पचनक्षमता सुधारते

लाल पेरूचा प्रभाव हा थंड असतो. त्यामुळे, पोटासाठी हा पेरू खूप चांगला असतो. लाल पेरूचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.

मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

Health Care | esakal