सकाळ डिजिटल टीम
तुमच्या आहारात लाल तांदळाचा समावेश करा आणि मिळवा फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर लाभ.
लाल तांदळातील पोषणतत्त्वे हृदयविकाराचा धोका कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.
फायबरयुक्त लाल तांदूळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतो.
अँथोसायनिनने भरलेला लाल तांदूळ त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करतो आणि त्वचेला उजळ बनवतो.
लाल भात पचन सुधारतो, चयापचय वाढवतो आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न करतो.
लाल तांदूळ शरीरातील सूज आणि जळजळ नियंत्रित करून विविध आजारांपासून संरक्षण करतो.
क्वेर्सेटिन, मायरिसेटिन व अँटिऑक्सिडंट्स शरीराला आजारांविरुद्ध लढण्यास सक्षम करतात.
फायबर आणि स्टार्चमुळे लाल तांदूळ पचनक्रिया सुधारतो व आतड्यांचे आरोग्य राखतो.