Yashwant Kshirsagar
सदाफुली (सदाबहार) हे झाड कुठेही सहज उगवतं आणि याचे फुल रंगीत आणि आकर्षक असतात. मात्र, फक्त फुलच नव्हे तर त्याच्या पानांनाही औषधी महत्त्व आहे.
सदाफुलीच्या पानांचा स्वाद कडवट असतो, पण या पानांमध्ये आरोग्यासाठी अनेक फायदेशीर गुणधर्म असतात.
सदाफुलीची पाने खाल्ल्याने रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रित राहतो. नियमित सेवन केल्यास हृदय देखील मजबूत राहते.
सदाफुलीची पाने त्वचेच्या अॅलर्जी, लालसरपणा आणि संसर्ग यांवर उपयोगी ठरतात. यामुळे त्वचा निरोगी राहते.
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी सदाफुलीची पाने नक्कीच सेवन करावी. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
घसा खवखवणे, संसर्ग किंवा सर्दीसारख्या तक्रारींवर ही पाने गुणकारी ठरतात. यामुळे घशात आराम मिळतो.
या पानांना थेट चावून खाऊ शकता किंवा त्याचा रस काढून देखील प्यायला जाऊ शकतो.
दररोज एक-दोन पाने खाल्ल्याने शरीरात प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होते.
ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणताही उपचार सुरु करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.