आरोग्यासाठी फायदेशीर आहे कलिंगड, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

कलिंगड

उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना कलिंगड खायला आवडते.

watermelon benefits

कलिंगडामध्ये फायबर्सचे आणि पाण्याचे भरपूर प्रमाण आढळून येते.

watermelon benefits

भरपूर पोषकतत्वांनी युक्त असलेले हे कलिंगड आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचे इतर आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

watermelon benefits

हृदयासाठी फायदेशीर

कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची निर्मिती रोखता येते. कलिंगड हे हृदयविकाराचा धोका कमी करू शकते.

watermelon benefits

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कलिंगड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले फायबर आतडी निरोगी ठेवण्याचे काम करते.

watermelon benefits

वजन नियंत्रित राहते

कलिंगडामध्ये फायबर्सचे आणि पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, कलिंगडाचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते. फार काळ भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

watermelon benefits

हाडांना मिळते बळकटी

कलिंगडाच्या बिया आणि कलिंगड हे हाडांसाठी उत्तम असते. यामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड, प्रोटीन, झिंक, फोलेट, पोटॅशियम आणि कॉपर मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे, हाडांना बळकटी मिळते.

watermelon benefits

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची 'ही' वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहेत का?

Kaziranga National Park | esakal