भातावर तूप घालून खाण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क..

Aishwarya Musale

तूप

अनेकांचा असा समज असतो की तूप हे फॅट्सयुक्त असल्याने त्यामुळे शरीरात कॅलरीज वाढू शकतात. विशेषतः जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर अशा गोष्टींपासून लांबच राहायला हवं.

पण तुम्हाला माहित आहे का, अनेक आहारतज्ज्ञांनी आजवर अनेकदा तुपाचे महत्त्व अधोरेखित करताना हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय असल्याचे नमूद केले आहे.

आज आपण भातावर तूप घालून खाण्याचे विविध फायदे जाणून घेणार आहोत.

पचन

साजूक तूप आणि भात या दोन्ही गोष्टी पचनास चालना देतात. त्यामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

तसेच केवळ एक अर्धा चमचा तूप खाल्ल्यानेही शरीरातील विषारी घटक बाहेर पडून ते डीटॉक्स होतं.

तुपामधील फॅटी अ‍ॅसिड रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.

तुपामधे लिनोलेनिक अ‍ॅसिड असतं जे हदयाशी संबंधित आजारांचा धोक कमी करतो.

हे फायदे असूनही अधिक फॅट्स असल्यामुळे तुप प्रमाणात वापरणे महत्वाचे आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या फॅट्सचे अति प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि काही आजारांचा धोका वाढू शकतो.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात?