वेलची आणि दूध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी...

Aishwarya Musale

दूध

दररोज सकाळी नाश्त्यात किंवा रात्री एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला घरातील वडीलधारी मंडळी नक्कीच देतात. कारण यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रथिने तुमच्या हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या चांगल्या विकासासाठी खूप आवश्यक आहेत.

वेलची

त्याचबरोबर दुधात वेलची घालून त्याचे सेवन केल्यास त्याचे फायदे चार पटीने वाढू शकतात. दोन्हीतील पोषक तत्व शरीराच्या आरोग्यासाठी खूप मदत करतात. वेलची दुधात मिसळली की त्यातील पोषकतत्त्वे वाढतात.

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही वेलचीचे दूध खूप फायदेशीर आहे. वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

अनेक खाद्यपदार्थांमध्ये वेलचीचा समावेश केला जातो. वेलची अन्नाची चव वाढवण्याचे काम करते. आरोग्याच्या दृष्टीने वेलची खूप फायदेशीर आहे.

वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, प्रथिने, फायबर, रिबोफ्लेविन, नियासिन इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. दुधात वेलची घालून त्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.

या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्याने चयापचय वाढतो. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी होतात.

त्यांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी होते.

रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात. यामुळे चांगली झोप येते. हे दूध सर्दी-खोकलामध्येही खूप फायदेशीर आहे.

भातावर तूप घालून खाण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क..