Monika Shinde
ब्रेड-ऑम्लेट हा अनेकांचा आवडता सकाळचा नाश्ता आहे. सोपा, जलद आणि स्वादिष्ट, तरीही दररोज खाल्ल्यास शरीरावर कसे परिणाम होतात, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
अंड्यात प्रोटीन, जीवनसत्त्वे B, कोलीन आणि आवश्यक अमिनो ॲसिड्स भरपूर असतात. हे स्नायूंच्या वाढीसाठी, मेंदूच्या कार्यासाठी आणि मेटाबॉलिझमसाठी फायदेशीर आहेत.
ब्रेड-ऑम्लेटची पोषणमूल्य मुख्यतः ब्रेडच्या प्रकारावर अवलंबून असते. व्हाईट ब्रेड पटकन पचतो, रक्तातील साखर वाढवतो आणि लवकर भूक निर्माण करतो.
होळ ब्रेड किंवा मल्टिग्रेन ब्रेड पर्याय चांगले ठरतात. त्यात फायबर जास्त, पचन हळू आणि पोट भरल्यासारखे राहते. शरीराला उर्जा दीर्घकाळ मिळते.
दररोज ऑम्लेटमध्ये जास्त तेल, बटर किंवा पांढऱ्या ब्रेडचा वापर केल्यास, कैलोरी वाढते आणि वजन नियंत्रण कठीण होते. संतुलित प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.
ऑम्लेटमध्ये भाज्या, टोमॅटो, कांदा, मिरची घालून फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स वाढवता येतात. त्यामुळे पोषण मूल्य अधिक टिकते.
संतुलित ब्रेड-ऑम्लेट वजन नियंत्रणासाठीही योग्य आहे. संपूर्ण अन्नसंयोजन, तेलाचे प्रमाण आणि पोषणाचे संतुलन योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे.