Heart Attack Symptoms : हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देते 'हे' 3 मोठे इशारे; चुकूनही करू नका सामान्य दुखणं समजून दुर्लक्ष!

बाळकृष्ण मधाळे

'हॉर्ट अटॅक' जीवघेणा आजार

हॉर्ट अटॅक हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असून, तो येण्यापूर्वी शरीर अनेक महत्त्वाचे इशारे देत असते. या संकेतांकडे वेळेत लक्ष दिल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो.

Heart Attack Symptoms

|

esakal

हार्ट अटॅकपूर्वी दिसणारी सामान्य लक्षणे

हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत दडपण किंवा अस्वस्थता जाणवू शकते. यासोबतच श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, मळमळ, चक्कर येणे किंवा अनपेक्षितपणे थकवा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

Heart Attack Symptoms

| esakal

हार्ट अटॅक का ठरतो धोकादायक?

हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होण्याचा धोका वाढतो. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये जीवितहानीदेखील होऊ शकते.

Heart Attack Symptoms

|

esakal

जीवनशैलीचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

अनियमित आहार, तेलकट आणि जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

Heart Attack Symptoms

| esakal

१. छातीत वेदना किंवा दडपण

हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी वेदना, दडपण किंवा जडपणा जाणवणे. काही व्यक्तींना छातीत जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ही वेदना काही मिनिटे टिकू शकते किंवा वारंवार येऊ शकते.

Heart Attack Symptoms

|

esakal

२. मान, जबडा आणि पाठीत वेदना

काही व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकपूर्वी वेदना मान, जबडा आणि वरच्या पाठीपर्यंत पोहोचू शकते. गळ्यात ताण जाणवणे, खालच्या जबड्यात दुखणे किंवा पाठदुखीचा त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही वेदना हळूहळू वाढत जाते आणि अनेकदा छातीतल्या अस्वस्थतेसोबत जाणवते.

Heart Attack Symptoms

|

esakal

३. डावा हात आणि खांद्यात वेदना

हार्ट अटॅकपूर्वी छातीत सुरू झालेली वेदना डाव्या खांद्यापर्यंत आणि हातापर्यंत पसरू शकते. काही वेळा कोपरापर्यंत किंवा दोन्ही हातांमध्येही अस्वस्थता जाणवू शकते. हे लक्षण हृदयाशी संबंधित समस्येचे महत्त्वाचे संकेत मानले जाते.

Heart Attack Symptoms

|

esakal

महत्त्वाची सूचना

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या किंवा जवळच्या रुग्णालयात संपर्क साधा. वेळेत उपचार मिळाल्यास हार्ट अटॅकमुळे होणारे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.

Heart Attack Symptoms

|

esakal

Health Tests After 30 : कॅन्सरपासून हृदयाच्या आजारांपर्यंत... तिशीनंतर वाढतोय धोका! 'या' 5 चाचण्या अजिबात टाळू नका

Why Health Screenings Are Important After Age 30

|

esakal

येथे क्लिक करा...