Chapati Calories : दिवसाला 4 चपात्या खाल्ल्याने शरीराला किती कॅलरीज मिळतात? वजन कमी करणाऱ्यांनी 'हा' हिशोब नक्की पाहा!

बाळकृष्ण मधाळे

भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग

चपाती हा भारतीयांच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग मानला जातो. बहुतांश घरांमध्ये जेवणाच्या ताटात चपाती किंवा भाकरी हमखास असते.

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

आरोग्याची काळजी महत्त्वाची

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे ठरले आहे.

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

कॅलरींचे योग्य प्रमाण जाणून घेणे आवश्यक

विशेषतः वजन कमी करायचे असो किंवा वाढवायचे, कॅलरींचे योग्य प्रमाण जाणून घेणे आवश्यक असते.

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

चपातीत किती कॅलरीज असतात?

अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, एका चपातीत नेमक्या किती कॅलरीज असतात?

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

गव्हाच्या चपातीत किती कॅलरीज आढळतात?

साधारणपणे ६ इंच व्यासाच्या मध्यम आकाराच्या गव्हाच्या एका चपातीत सुमारे ७० ते ८० कॅलरीज आढळतात.

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

चार चपात्यांमधून किती कॅलरीज शरीराला मिळतात?

त्यानुसार चार चपात्यांमधून अंदाजे २८० ते ३२० कॅलरीज, म्हणजेच सरासरी ३०० कॅलरीज शरीराला मिळतात.

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

आरोग्य तज्ज्ञांच काय मत?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे १,८०० ते २,२०० कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे चार साध्या चपात्यांमधून दैनंदिन कॅलरी गरजेपैकी जवळपास १५ टक्के कॅलरीज मिळतात.

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

चपाती पौष्टिक आणि आरोग्यदायी

गव्हापासून बनविलेली चपाती ही केवळ ऊर्जा देणारी नसून पचनासाठीही लाभदायक मानली जाते. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून चपाती हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो.

How Many Calories are in Four Chapatis

|

esakal

Titvi Bird Monsoon Prediction : निसर्गाचा हवामान तज्ज्ञ! टिटवीच्या अंड्यांवरून शेतकरी कसा ओळखतात पावसाचा काळ? वाचा यामागचं सत्य

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

येथे क्लिक करा...