Titvi Bird Monsoon Prediction : निसर्गाचा हवामान तज्ज्ञ! टिटवीच्या अंड्यांवरून शेतकरी कसा ओळखतात पावसाचा काळ? वाचा यामागचं सत्य

बाळकृष्ण मधाळे

हवामानाचा अंदाज बांधण्याची परंपरा

ग्रामीण भागात निसर्गातील अनेक घटकांच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याची परंपरा आजही कायम आहे. अशाच पारंपरिक निरीक्षणांमध्ये 'टिटवी' या पक्ष्याला विशेष महत्त्व दिले जाते.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

निसर्गाचा हवामान तज्ज्ञ

अनेक गावांमध्ये टिटवीला निसर्गाचा हवामान तज्ज्ञ मानले जाते. दरवर्षी मान्सूनपूर्व काळात तिच्या हालचाली आणि वर्तनावरून पावसाचा अंदाज बांधला जातो.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

अंड्यांच्या संख्येवरून ठरतो पावसाचा अंदाज?

टिटवी हा पक्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी अंडी घालतो. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मते, टिटवीने दिलेल्या अंड्यांच्या संख्येवरून त्या वर्षातील पावसाचा कालावधी निश्चित होतो.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

एक अंडे असल्यास एक महिना पाऊस

या समजुतीनुसार, एक अंडे असल्यास एक महिना, दोन अंडी असल्यास दोन महिने, तीन अंडी असल्यास तीन महिने आणि चार अंडी असल्यास संपूर्ण चार महिने दमदार मान्सून राहतो, असे मानले जाते.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

टिटवीच्या अंड्यांवरून पावसाचे संकेत

यंदाही टिटवीने दिलेल्या अंड्यांच्या संख्येवरून सरासरी पावसाचे संकेत मिळत असल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

पावसाचे वातावरण तयार होताच टिटवी ओरडते

पावसाचे वातावरण तयार होताच हा पक्षी मोठ्या आवाजात ओरडत परिसरात फिरताना दिसतो. त्यामुळे गावकरी त्याच्या आवाजालाही पावसाच्या आगमनाचा संकेत मानतात.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

अंड्यांच्या जागेवरूनही बांधला जातो अंदाज

टिटवी पक्ष्याच्या अंड्यांची संख्या जितकी महत्त्वाची मानली जाते, तितकेच महत्त्व अंडी घालण्याच्या जागेलाही दिले जाते. हा पक्षी झाडांवर घरटे बांधत नाही. तो उघड्या शेतात किंवा जमिनीवरच अंडी घालतो.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

...तर सामान्य पावसाचा अंदाज

जर टिटवीने अंडी शेतातील सखल भागात किंवा सपाट जमिनीवर दिली असतील, तर त्या वर्षी पाऊस सामान्य राहील असा अंदाज व्यक्त केला जातो.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

टिटवी उंच जागा निवडते!

मात्र, अंडी उंचावरील सुरक्षित ठिकाणी दिली असतील, तर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे मानले जाते. पुराच्या पाण्यापासून अंड्यांचे संरक्षण व्हावे यासाठीच टिटवी उंच जागा निवडते, अशी लोकांची धारणा आहे.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

पारस दगडाची कथा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

टिटवी पक्ष्याबाबत ग्रामीण लोककथांमध्ये आणखी एक रंजक समज प्रचलित आहे. काही कथांनुसार, टिटवी आपल्या अंड्यांतून पिल्ले बाहेर येण्यासाठी 'पारस दगड' शोधते. पारस दगड हा असा जादुई दगड मानला जातो की, त्याच्या स्पर्शाने लोखंडाचेही सोने होते, असे सांगितले जाते.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

कथेला कोणताही वैज्ञानिक आधार नाही!

मात्र, या कथेला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. विज्ञानाच्या दृष्टीने पारस दगडाचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. तसेच टिटवी पक्ष्याच्या प्रजनन प्रक्रियेशी अशा कोणत्याही दगडाचा संबंध असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत.

How does the Titvi bird forecast rain?

|

esakal

Pigeon Eggs at Home : तुमच्याही बाल्कनीत कबुतराने अंडी दिलीत? मग हे गुपित तुम्हाला माहित असायलाच हवे, अन्यथा होईल मोठे नुकसान!

Pigeon Eggs at Home

|

esakal

येथे क्लिक करा...