सूरज यादव
धकाधकीच्या काळात गंभीर आजार किंवा अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ कधीही येऊ शकते. उपचारांचा खर्च आर्थिक गणितं बिघडवू शकतो. त्यामुळे आरोग्य विमा महत्त्वाचा ठरतो.
Mediclaim Policy
Esakal
आरोग्य विमा अशा वैद्यकीय खर्चाचा आर्थिक भार कमी करण्यास मदत करतो. मात्र, विमा घेतला म्हणजे हॉस्पिटलचे संपूर्ण बिल विमा कंपनी भरेल, असा समज चुकीचा आहे.
Mediclaim Policy
Esakal
क्लेम किती आणि कसा मंजूर होईल, हे पॉलिसीच्या अटी व शर्तींवर अवलंबून असते. उपचाराचे स्वरूप, आजाराची स्थिती, पॉलिसीमध्ये असलेले कव्हरेज यानुसार विमा दावा मंजूर होतो.
Mediclaim Policy
Esakal
कमी प्रीमियमपेक्षा पॉलिसीत नेमकं काय कव्हर आहे आणि काय कव्हर नाही, हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. चुकीची माहिती भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकते.
Mediclaim Policy
Esakal
पॉलिसी घेण्यापूर्वी वगळलेल्या बाबी (Exclusions), प्रतीक्षा कालावधी (Waiting Period), खोली भाड्याची मर्यादा आणि सहभागित रक्कम (Co-payment) यांची माहिती घ्या.
Mediclaim Policy
Esakal
पॉलिसीमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सुविधा आहे का, कोणती रुग्णालये नेटवर्कमध्ये आहेत आणि कॅशलेस उपचारासाठी काय प्रक्रिया आहे, हे आधीच तपासा.
Mediclaim Policy
Esakal
पॉलिसीधारकाने Policy Document, Insurance Card, Exclusions, Waiting Period आणि Claim Procedure यांची संपूर्ण माहिती स्वतःसह कुटुंबाकडेही ठेवावी.
Mediclaim Policy
Esakal
आरोग्य विमा हा केवळ खर्च नसून अनपेक्षित वैद्यकीय संकटापासून कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणारे महत्त्वाचे साधन आहे. आपल्या मेडिक्लेम पॉलिसीतील कव्हरेज, मर्यादा आणि अटी आधीच नीट समजून घ्या.
Mediclaim Policy
Esakal
Car Airbag
Esakal