सकाळ डिजिटल टीम
एअरबॅग अपघाताच्या वेळी प्रवाशांना स्टीअरिंग, डॅशबोर्ड, दरवाजे यावर आदळण्यापासून वाचवते. एअरबॅग काही मिलीसेकंदांत कशी उघडते? आधीपासून हवा भरलेली असते का? जाणून घ्या तंत्रज्ञान
Car Airbag
Esakal
एअरबॅगमध्ये सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आणि गॅस तयार करणारी रासायनिक प्रक्रिया काम करते. अपघात होताच संपूर्ण यंत्रणा काही मिलीसेकंदांत सक्रिय होऊन एअरबॅग फुगतेय.
Car Airbag
Esakal
अपघाताची तीव्र धडक जाणवताच एअरबॅग १० ते ३० मिलीसेकंदांत उघडू शकते. गंभीर धडक बसल्याचं सेन्सरला जाणवताच एअरबॅग उघडण्यासाठी यंत्रणा तयार केली जाते.
Car Airbag
Esakal
एअरबॅगमध्ये गुआनिडिनियम नायट्रेट आणि कॉपर नायट्रेट यांसारखे केमिकल वापरले जाते. यापासून तयार झालेला गॅस एअरबॅगला क्षणार्धात फुगवतो.
Car Airbag
Esakal
पूर्वी अनेक एअरबॅग सिस्टममध्ये अमोनियम नायट्रेट वापरले जात होते. आर्द्रतेमुळे अमोनियम नायट्रेटचा गरजेपेक्षा जास्त दाब निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे आता वापर होत नाही.
Car Airbag
Esakal
एअरबॅग नायलॉनच्या कापडापासून बनलेली असते आणि ती बराच काळ घडी घातलेल्या अवस्थेत असते. ते कापड एकमेकांना चिकटू नये म्हणून त्यावर टॅल्कमसारख्या पावडरचा वापर केला जातो.
Car Airbag
Esakal
कारमधील MEMS सेन्सर्स अचानक झालेली वेगातील घट आणि धडकेची तीव्रता मोजतात. सीट बेल्टची स्थिती आणि इतर सेन्सर्सच्या आधारे एअरबॅग कधी आणि कशी उघडायची हे ठरतं.
Car Airbag
Esakal
काही आधुनिक कारमध्ये रोलओव्हर सेन्सर्सही असतात. गाडी उलटण्याची शक्यता असल्यास साइड आणि कर्टेन एअरबॅग ओपन होतात.
Car Airbag
Esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Important note
sakal