संतोष कानडे
जगातील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी 'गॅलेरी टेस्ट' नावाच्या एका अशा रक्ताच्या चाचणीचा शोध लावला आहे, जी शरीरात कोणतीही लक्षणे दिसण्यापूर्वीच कॅन्सर शोधू शकते.
या एकाच 'लिक्विड बायोप्सी' चाचणीद्वारे स्वादुपिंड, गर्भाशय, फुफ्फुस आणि मूत्राशयाच्या कॅन्सरसह तब्बल ५० पेक्षा जास्त प्रकारच्या कॅन्सरचा शोध लावता येतो.
कॅन्सरच्या पेशी जेव्हा मृत होतात, तेव्हा त्यांचे सूक्ष्म तुकडे रक्तामध्ये मिसळतात. ही चाचणी रक्तातील त्या विशिष्ट 'कॅन्सर डीएनए' फिंगरप्रिंटचा शोध घेते.
अनेकदा कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला पोहोचल्यावर त्याची लक्षणे दिसतात; मात्र ही चाचणी पहिली किंवा दुसरी स्टेज असतानाच रक्तातील सिग्नल ओळखते.
ब्रिटनच्या 'एनएचएस' आणि अमेरिकेत १ लाख ४० हजारपेक्षा जास्त लोकांवर या चाचणीच्या महाकाय वैद्यकीय चाचण्या नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत.
२०२६ मधील ताज्या क्लिनिकल अहवालानुसार, या चाचणीमुळे सर्वात घातक मानल्या जाणाऱ्या १२ कॅन्सरचे 'स्टेज ४' (अंतिम टप्पा) मधील निदान होण्याचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक कमी झाले आहे.
ही चाचणी केवळ शरीरात कॅन्सर आहे की नाही एवढेच सांगत नाही, तर तो कॅन्सर शरीराच्या कोणत्या अवयवात सुरू झाला आहे, याचा ८८% अचूक अंदाज वर्तवते.
या चाचणीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, ज्यांना कॅन्सर नाही अशा निरोगी लोकांच्या बाबतीत ही चाचणी ९९% वेळा 'नेगेटिव्ह' रिझल्ट देऊन अचूकता सिद्ध करते.
कॅन्सर शोधण्यासाठी लागणाऱ्या वेदनादायी एन्डोस्कोपी किंवा अवघड स्कॅनिंगच्या तुलनेत ही चाचणी लॅबमध्ये दिल्या जाणाऱ्या साध्या रक्ताच्या थेंबासारखी सोपी आहे.
जर वार्षिक तपासणीमध्ये या चाचणीचा समावेश केला, तर सुरुवातीच्या काळातच कॅन्सरचा 'गेम ओव्हर' करून जगात लाखो लोकांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे.